यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील अंजाळे गावात महाराष्ट्र राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस पिकाची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी योजना २०२३-२४ अंतर्गत कापूस पिकाची शेतीशाळा क्षेत्र दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास शेतकरी बांधवांकडून प्रतिसाद मिळाला.
यावेळी संपूर्ण खरीप हंगामातील शेतीशाळा कार्यक्रमाचा उहापोह करणे करिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या शेतीशाळा कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून अंजाळे ग्रामपंचायतच्या सरपंच नलिनी सपकाळे या होत्या. यावल मंडळ कृषी अधिकारी पी. आर. कोळी यांनी कापूस पिकात नवीन पद्धतीचा अवलंब करून उत्पादन वाढीच्या विषयी चर्चा करून कार्यक्रमास उपस्थित शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच कृषी पर्यवेक्षक फैजपूर एम. जी. आगीवाल यांनी कापूस विषयावर सखोल असे मार्गदर्शन करत पीएमएफएम आदी विषयावर विकास कुंभार यांनी सविस्तर अशी माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन. जे.पाटील, कृषी पर्यवेक्षक यावल २, नारखेडे कृषी पर्यवेक्षक किनगाव यांनी गट शेती तसेच सेंद्रिय शेती विषयी माहिती दिली. सविता चव्हाण, शबाना तडवी, मनीषा तायडे सर्व कृषी सहाय्यक यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन जी.टी.निंबोळकर कृषी सहाय्यक यांनी केले. कार्यक्रमास उपस्थितांचे आभार समिधा अडकमोल कृषी सहाय्यक अंजाळे यांनी मानले.