म्हसावद व चिंचोली येथे पालकमंत्र्यांच्याहस्ते शासकीय भरड धान्य खरेदीस प्रारंभ !

जळगाव प्रतिनिधी । राज्य शासनाच्या भरडधान्य खरेदी योजनेस आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते म्हसावद आणि चिंचोली येथे शुभारंभ करण्यात आला. यात म्हसावद येथे तालुका शेतकी संघातर्फे धान्य खरेदी सुरू करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते काटा पूजन करून पहिल्यांदा माल आणलेल्या शेतकर्‍यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी पालकमंत्री म्हणाले की, राज्य शासन हमी भावाने धान्य खरेदी करत असल्याने शेतकर्‍यांना वाजवी दर मिळून त्यांना लाभ होत आहे. तर धान्य दीर्घ काळापर्यंत सुरक्षित टिकवण्यासाठी गोदाम आवश्यक असून म्हसावद येथे गोदामाच्या बांधकामासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री यांनी केले. याप्रसंगी त्यांनी शेतकी संघाने धान्य खरेदीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना उत्तम भाव देतांनाच संस्थात्मक पातळीवर नफा मिळवल्याबद्दल कौतुक केले. तर यानंतर चिंचोली येथे कृषी औद्योगिक सेवा सहकारी संस्थेतर्फे शासकीय धान्य खरेदीचा शुभारंभ पालकमंत्र्यांनी केला.

 

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार नामदेव पाटील, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, जि.प. सदस्य पवन सोनवणे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, शिवसेना उपजिल्हा संघटक नाना सोनवणे, शेतकी संघाचे चेअरमन अजबराव पाटील, संचालक विजय सोनवणे, पंचायत समिती उपसभापती यांचे पती समाधान चिंचोरे,  सरपंच गोविंद पवार, रोहयो योजना तालुका अध्यक्ष रवींद्र कापडणे, किशोर चिंचोरे, अनिल भोळे, सचिन पाटील, नारायण चव्हाण, महेंद्र पाटील, मधुकर चव्हाण, हौसीलाल परदेशी, परिसरातील सरपंच शिरीष जाधव, डॉ. सुधाकर पाटील, निंबा ठाकरे, विष्णू आप्पा चिंचोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

 

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले. तर शासकीय खरेदीसाठी सर्वप्रथम माल आणलेल्या बिलवाडी येथील भगवान पाटील या शेतकर्‍याचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने म्हसावद येथे शासकीय धान्य खरेदी केंद्राला गेल्या वर्षी परवानगी मिळाली होती. या वर्षभरात केंद्रावर मका ४ हजार ६६ क्विंटल, ज्वारी ४७१२ क्विंटल; गहू १४ आणि हरबरा ८ हजार २० क्विंटल इतकी खरेदी करण्यात आली. खरीप आणि रब्बी हंगामातील या खरेदीमुळे परिसरातील शेतकर्‍यांच्या कृषी मालास वाजवी भाव मिळाला. यासोबत शेतकी संघाला ५ लाख ६२ हजार इतका नफा राहिला. यामुळे परिसरातील शेतकर्‍यांनी भाऊंचा हृद्य सत्कार केला.

 

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून राज्य सरकारच्या धान्य खरेदीचा परिसरातील शेतकर्‍यांना लाभ होण्यासाठी म्हसावद येथे शेतकी संघाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्राच्या यशस्वी वाटचालीबद्दल संचालकांचे कौतुक केले. शेतकी संघाने आता गोडाऊन उभारणीचे प्रयत्न सुरू केले असून यासाठी आपली सर्वतोपरी मदत राहणार आहे. यासाठीचा प्रस्ताव संघाने तातडीने सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले. तर म्हसावद येथील तब्बल ३० कोटी रूपयांची तरतूद असणार्‍या पुलाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली. तर म्हसावदकरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची दूर करण्यासाठी आधीची योजना समाप्त करून नवीन 5योजना मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दक्षता समिती सदस्य अर्जुन पाटील यांनी केले. तर आभार शेतकी संघाचे मॅनेजर दीपक पाटील यांनी मानले.

 

यानंतर चिंचोली येथे कृषी औद्योगिक सेवा सहकारी संस्थेतर्फे शासकीय धान्य खरेदीचा शुभारंभ पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार नामदेव पाटील, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, जि.प. सदस्य पवन सोनवणे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, कृषी औद्योगीक सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन शैलजाताई निकम, व्हाईस चेअरमन संजय पाटील, संचालक रामभाऊ पाटील, रोहित निकम, रमेशआप्पा पाटील, शांताराम सोनवणे, वसंत साबळे, वाल्मिक पाटील, नाना पाटील, पंस. सभापती यांचे पती जनाआप्पा कोळी, मॅनेजर विश्‍वनाथ पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

 

Protected Content