धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूल आणि बालकवी ठोंबरे विद्यालयात आज महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्यातर्फे मोफत वह्या वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना पी. एम. पाटील सर यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समाजोपयोगी कार्याची माहिती दिली. ते म्हणाले की, गुलाबराव पाटील साहेब केवळ वह्या वाटप करत नाहीत, तर मतदारसंघातील गरजू व्यक्तींसाठी विविध उपक्रम राबवतात. यामध्ये दिव्यांगांसाठी तीन चाकी सायकली, ग्रामीण भागातील मुलींसाठी सायकली, कीर्तनकारांसाठी कीर्तनाचे साहित्य, तसेच पंढरपूरला दर्शनासाठी जाऊ न शकणाऱ्या भक्तांसाठी स्वतंत्र येण्या-जाण्यासाठी बसेस आणि रेल्वेची मोफत व्यवस्था असे अनेक प्रयत्न ते आणि त्यांचा परिवार करत असतो. समाजासाठी जे जे शक्य असेल, ते सर्व करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो, असे पाटील सर यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला चर्मकार समाजाचे नेते भानुदास आप्पा विसावे, महात्मा फुलेचे मुख्याध्यापक जे. एस. पवार, बालकवी विद्यालयाचे सचिव ललित उपासनी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शाळेचे सर्व कर्मचारी आणि मुख्याध्यापक उपस्थित होते. यावेळी शिवसेना परिवाराचे विनय भावे, विजय महाजन, वाल्मीक पाटील, विलास महाजन, गजानन पाटील, मच्छिंद्र पाटील, अहमद पठाण, धीरेंद्र पूर्भे, बाळासाहेब जाधव, संजय चौधरी, हेमंत चौधरी, तोसिफ पटेल, सुदर्शन भागवत, संजय पवार, मोनू महाजन, किरण महाजन यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. गुलाबराव पाटील यांच्या या समाजोपयोगी कार्यामुळे विद्यार्थ्यांसह इतर गरजू घटकांनाही मोठा आधार मिळत आहे.



