Home Cities धरणगाव बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयाचे दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले

बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयाचे दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले

0
229


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव येथील शिक्षण क्षेत्रात आनंदाची बातमी आहे. बालकवी ठोंबरे विद्यालय आणि सारजाई कुडे विद्यालयाचे दोन होतकरू विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. मोहित नारायण चौधरी आणि कु. मोनाली लक्ष्मण गोसावी अशी या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

या यशाबद्दल या विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीपर्यंत दरवर्षी रुपये पाच हजार इतकी शिष्यवृत्ती शासनाकडून मिळणार आहे. यामुळे त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मोठा हातभार लागणार आहे.

मोहित आणि मोनाली यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. हेमलालशेठ भाटिया, सचिव ललितजी उपासनी, उपाध्यक्ष चिंतामण पाटील, संचालक तसेच मुख्याध्यापक जीवन पाटील व मुख्याध्यापक एस. एस. पाटील, तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका आणि कर्मचारी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांना हे यश मिळवण्यासाठी एन. पी. वाणी आणि व्ही. एल. मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. धरणगावच्या या विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाने शाळेचे आणि गावाचे नाव उज्वल केले आहे.


Protected Content

Play sound