Home आरोग्य भडगावात भव्य रक्तदान शिबिर; ६० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग!

भडगावात भव्य रक्तदान शिबिर; ६० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग!

0
268


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत, अटल भाजपा कार्यालय, भडगाव येथे अमोलभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ६० रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले, ही एक कौतुकास्पद बाब ठरली.

आज, मंगळवार, २२ जुलै २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत अटल भाजपा कार्यालय (नवकार प्लाझा, पंचायत समिती भडगाव) आणि अमोलभाऊ शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात हे शिबिर घेण्यात आले. यावेळी बोलताना अमोल शिंदे यांनी सांगितले की, पक्षाच्या आदेशानुसार हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, कार्यकर्ते आणि युवकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भविष्यातही अशाच प्रकारे आणि यापेक्षाही मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या शिबिराला माजी विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे, माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, माजी जिल्हा चिटणीस प्रमोद पाटील, ज्येष्ठ पदाधिकारी दगडू महाजन (कोळगाव), दिलीप सहस्रबुद्धे, नीलेश मालपुरे, विनोद नेरकर, देविदास पाटील, माजी नगरसेवक सचिन चोरडिया, माजी शहराध्यक्ष शैलेश पाटील, नरेंद्र पाटील, मुन्ना परदेशी, एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र सोनवणे, यश चोपडा, माजी नगरसेवक संजय सोनवणे, किरण मोरे, डॉ. प्रतापराव पाटील, डॉ. अमृत पाटील, प्रवीण पाटील (पेठ), दत्तु सूर्यवंशी (शिंदी), सुनील पाटील (लोण), दिगंबर पाटील (गूढे), भयदास पाटील (वडजी), राजेंद्र शिंपी, कैलास पाटील, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश भंडारी, तांदूळवाडी सरपंच नकुल पाटील, वाल्मीक पाटील, विश्वनाथ भोई, कजगावं माजी सरपंच मनोज धडीवाल, प्रदिप पाटील (वडजी), विजय गायकवाड, योगेश बोरसे (गिरड), रविंद्र वाडेकर, मंगेश पाटील (निंभोरा), राहुल देशमुख, कुणाल पाटील, निखिल कासार, योगेश शेलार, बापूराव शार्दुल, बन्सीलाल परदेशी, अमोल महाजन, अरुण पाटील, किरण शिंपी, विशाल चौधरी, ललित धनगर, सचिन पवार, शुभम सुराणा, विकास महाजन, भूषण पाटील (पिचर्डे) यांसह रेड प्लस जळगाव येथील डॉ. दीपक पाटील, टेक्निशियन सत्यम राठोड, उमेश पाटील, पूजा मॅडम, भाजपचे अमोल महाजन, मनोहर गिरनार (पिंपरखेड), अरुण पाटील (अंजनविहिरे), तसेच भडगाव, कनाशी, कोटली, शिंदी, पिचर्डे, अंजन्विहरे, गिरड, पळासखेड, महिंदळे आदी गावांतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र पाटील यांनी केले, प्रास्ताविक किरण शिंपी आणि विशाल चौधरी यांनी केले, तर आभार कुणाल पाटील यांनी मानले.


Protected Content

Play sound