जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । पैशांवरील व्याज देण्यावरून किराणा व्यावसायिकाला दोन जणांनी डोक्यात मोगरी मारल्याने त्यांना दुखापत केली आणि कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ करत दुकानातील साहित्याची तोडफोड केल्याची घटना जोशीपेठेत घडली होती. अखेर चौकशी अंती याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, किराणा व्यावसायिक असलेले प्रशांत सुरळकर यांच्या भावाने प्रशांत सुरेश कुंवर (वय-४५), आशीष प्रशांत कुंवर (वय-२५), दोन्ही रा. हॅपी होम कॉलनी या दोघांकडून पैसे घेतलेले होते. त्यावर अधिकचे व्याज मिळावे, अशी मागणी करण्यात आली. त्यावरून दोघांनी प्रशांत सुरळकर यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत किराणा दुकानातील साहित्याची तोडफोड केली. तसेच सुरळकर यांच्या डोक्यात मोगरी मारुन दुखापत करून त्यांच्यासह कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी सुरळकर यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून प्रशांत कुंवर व आशीष कुंवर यांच्याविरुदध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि योगेश ढिकले करीत आहेत.