यावल प्रतिनिधी | यावल येथील दत्त मंदीरात हुतात्मा बापू वाणी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी त्यांच्या आठवणींना उजाळा देत अभिवादन करण्यात आले.
शनिवार, दि.१ जानेवारी रोजी आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे शिक्षण आरोग्य व क्रीडा सभापती रवींद्र पाटील होते.
याप्रसंगी किशोर कुलकर्णी, वसंत भोसले, गोपाल सिंह पाटील, सुचिता नेवे यांनी हुतात्मा बापू यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबादास वाणी यांनी केले. कार्यक्रमास दादा वाणी, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नीलेश गडे, माजी पंचायत समितीचे सदस्य हर्षल पाटील, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, भाजपाचे तालुका सरचिणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, भास्कर तायडे, सुनील नेवे, चित्रा नेवे, नीलिमा नेवे, अजय नेवे, दरबारसिंग पाटील, भैय्या भोईटे, अंकुश नेवे, राम नागराज, डॉ. योगेश गडे, योगेश वाणी, चंद्रकांत नेवे, वसंत साळी, दत्तू माळी, दशरथ वाणी, पितांबर बारी, दिलीप वाणी, रमेश बारी यांचेसह शहरातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.