फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे महाविद्यालयातील युवती सभा आणि राष्ट्रीय सण महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जागतिक महिला दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डी.बी.तायडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवती सभा प्रमुख प्रा.डॉ.कल्पना पाटील यांनी तर सूत्रसंचालन व आभार राष्ट्रीय सन मोहत्सव समिती प्रमुख प्रा.डॉ.एस.एल.बिऱ्हाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.