जामनेरात भाजप स्थापना दिनी महापुरुषांना अभिवादन

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जामनेरात आज भारतीय जनता पार्टी स्थापना दिवसानिमित्त स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय व स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमा पूजन माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन व नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.

स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक छोटासा रोप लावलं होतं त्याचा आज भारतीय जनता पार्टी आहे जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा पक्ष झाला असून वटवृक्ष झाला आहे. मात्र आपण आता सर्वसामान्यांची मदत करून केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा असे आव्हान जामनेर येथील कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

आमदार गिरीश महाजन यांनी पुढे बोलताना सांगितले की भारतीय जनता पार्टी हे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशात सर्वसामान्य जनतेच्या हिताचे काम करीत असून शेवटच्या माणसापर्यंत सर्वांना योजना देण्यात जात आहे. त्याच बरोबर भारतीय जनता पार्टीच्या कालावधीमध्ये राम मंदिर तीन तलाक 370 कलम असे अतिशय चांगले निर्णय घेण्यात आले आहे. त्यामुळे आज आपण सर्वांनी सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर हजर राहिले पाहिजे व केंद्र सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचवा त्यामुळेच खऱ्या प्रकारे आपण भारतीय जनता पार्टीचे काम करत असल्याचे सार्थक करणार आहे, असे आव्हान यावेळी कार्यक्रमात बोलताना आमदार गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते छगन झाल्टे, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगर पालिका गटनेते डॉक्टर प्रशांत भांडे, नगरसेवक नाना बाविस्कर, अतिश झाल्टे, बाबुराव हिवराळे, उल्हास पाटील, सुहास पाटील, कैलास नरवाडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते नामदेव मंगरुळे, डॉक्टर संजीव पाटील, भाजपा सरचिटणीस रवींद्र झाल्टे, आनंदा लावरे, सुभाष पवार, कैलास पालवे, दीपक तायडे, मांगीलाल गील, अशोक पाटील, बाबूराव घोंगडे, राहुल चव्हाण, विजय शिरसाट यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

 

Protected Content