मलकापूर येथे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त अभिवादन

मलकापूर प्रतिनिधी । भारतरत्न लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४६ व्या जयंती निमित्त भातृ मंडळ मलकापूर येथे आयोजित कार्यक्रमात खा. रक्षा खडसे यांनी यांच्याहस्ते सरदार पटेल व स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

यावेळी सदर कार्यक्रमात आपले विचार मांडताना खासदार रक्षाताई खडसे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्त त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत स्वातंत्रानंतर भारताचे प्रथम गृहमंत्री असतांना त्यांनी कशा प्रकारे देशातील ५६५ संस्थानांचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण करून एकसंध भारत निर्माण केला याबद्दल माहिती दिली. सरदार पटेल हे एक नेतृत्वक्षमता, बुद्धिचातुर्य, कुशल व्यवस्थापक, व्यवहारिक व विनम्रतेने परिपूर्ण असे थोर नेत होते असे आपले विचार व्यक्त केले.

यावेळी सदर कार्यक्रमास खा.रक्षा खडसे यांच्यासह, मलकापूरचे आमदार राजेश एकडे, डॉ. अरविंद कोलते, वसंतराव शिंदे, मलकापुर नगराध्यक्ष ॲड. हरिष रावळ, हाजी रशीदखान जमादार, संतोष रायपुरे, बंडूभाऊ चौधरी, राजूभाऊ पाटील, प्रमोद अवसरमोल, शिरीष डोरले, जावेद कुरेशी, राजेंद्र वाडेकर, अनिल गांधी, अनिल जयस्वाल, जाकीर मेमन, अप्पासाहेब पाटील, डॉ. अनिल खर्चे सर, गावंडे सर, अरुणभाऊ अग्रवाल, प्रकाश पाटील धरणगाव, तुषारभाऊ पाटील, विलास पाटील, अरविंद पाटील, अनिल दादा झोपे, मंगेश पाटील, संजय किनगे, अनिल नाफडे, अरविंद किनगे, अजय नारखेडे, छगन चौधरी, समाधान इंगळे सर, व्ही. ओ. बोंडे सर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Protected Content