रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये पुढील आदेश येईपर्यंत बदल

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे रेल्वेद्वारे काही गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. या गाड्या पहिले दररोज चालवण्यात धावत होत्या , पण आता ह्या गाड्या आठवड्यातून एक दिवस पुढील आदेश येईपर्यंत धावणार असल्याचे भुसावळच्या रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

हावडा – अहमदाबाद विशेष गाडी अप / डाउन
दि.१० जुलैपासून गाडी क्र- ०२८३४ अप हावडा – अहमदाबाद विशेष गाडी प्रत्येक शुक्रवारी हावडा स्थानका वरून २३:५५ वाजता प्रस्थान रविवारी अहमदाबाद स्थानकावर दुपारी १३:२५ वाजता पोहोचेल.
थांबा – हावड़ा ते अहमदाबाद अप दिशा कडे जाणारी गाड़ी क्रं – ०२८३४ प्रत्येक शनिवारी भुसावल मंडल च्या बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगांव,जलंब स्थानका वर येईल व प्रत्येक रविवारी नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव स्थानकावर पोहोचेल.

दि -१३ जुलैपासून गाडी क्र- ०२८३३ डाऊन अहमदाबाद -हावडा विशेष गाडी प्रत्येक सोमवारी अहमदाबाद स्थानकावरून ००:१५ वाजता प्रस्थान करेल. मंगळवारी हावडा स्थानकावर दुपारी १३:३० वाजता पोहोचेल.
थांबा – अहमदाबाद- हावड़ा डाऊन दिशा कडे जाणारी गाड़ी क्रं – ०२८३३ प्रत्येक सोमवार भुसावल मंडल च्या जळगाव , भुसावळ , मलकापूर , नांदुरा , जलंब, शेगाव , अकोला , मूर्तिजापूर , बडनेरा , स्थानकावर पोहोचेल.

हावडा – मुंबई मेल विशेष गाडी अप / डाउन
दि १५ जुलैपासून गाडी क्र- ०२८१० अप हावडा – मुंबई मेल विशेष गाडी प्रत्येक बुधवार रोजी हावडा स्थानका वरून २०.०० वाजता प्रस्थान शुक्रवार रोजी मुंबई स्थानकावर सकाळी ०५.२० वाजता पोहोचेल.
थांबा –हावड़ा ते मुंबई अप दिशा कडे जाणारी गाड़ी क्रं – 02810 प्रत्येक गुरुवारी भुसावल मंडल च्या बडनेरा, मुर्तिजापूर , अकोला , शेगांव ,जलंब , नांदुरा, मलकापुर, भुसावळ, जलगाँव ,चाळीसगांव , मनमाड स्थानकावर येईल. आणि प्रत्येक शुक्रवारी नाशिक, देवळाली स्थानकावर पोहोचेल.
दि .१७.जुलैपासून गाडी क्र- ०२८०९ डाऊन – हावडा मेल विशेष गाडी प्रत्येक शुक्रवार रोजी मुंबई स्थानकावरून २०.३५ वाजता सुटेल व रविवार रोजी सकाळी ०५.५० वाजता हावडा स्थानकावर पोहोचेल.
थांबा –मुंबई ते हावड़ा डाऊन दिशा कडे जाणारी गाड़ी क्रं – ०२८०९ प्रत्येक शनिवारी भुसावळ मंडळच्या देवलाली, नाशिक , मनमाड ,चाळीसगांव , जळगांव , भुसावळ ,मलकापूर , नांदुरा , जलंब , शेगाव , अकोला , मूर्तिजापूर , बडनेरा नाशिक स्थानकावर पोहोचेल असे रेल्वे प्रशासनाने अधिकृतपणे कळविले आहे .

Protected Content