चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील लोंढे येथे भारतीय जनता पक्ष, वीर एकलव्य संघटना लोंढे व मंगेशदादा चव्हाण मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कूस्तीस्पर्धेचे आयोजन रविवार १८ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.
यूवा नेते मंगेश चव्हाण यांच्या सोबत तालुका सरचिटणीस प्रा.सूनील निकम, रोहीणी गावाचे सरपंच अनिल नागरे,जिल्हा अल्पसंख्यांक आघाडी सरचिटणीस अय्याज पठाण, चिंचगव्हाणचे सरपंच. सूभाष राठोड , सूरेश निकम ,जि.प.सदस्य अनिल गायकवाड, भोला पाटील यांचे आगमन झाल्यानंतर दरेगाव स्टँड पासून हनुमान मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.हनुमान मंदिरात दर्शन घेऊन नारळ वाढविण्यात आले. हनुमान मंदिरापासून महादेव मंदिरापर्यंत भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात आली. जागोजागी मंगेश चव्हाण यांचे औक्षण करण्यात आले. फटाके फोडून, घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. लोंढे वीर एकलव्य संघटनेचे अध्यक्ष संजू नाईक व सर्व एकलव्य संघटना सदस्यांनी मंगेश चव्हाण व मान्यवरांचा भव्य सत्कार केला. हजारोंच्या संख्येने दरेगाव, लोंढे, विसापूर, पिंपळवाडी, कृष्णापुरी, दरातांडा, वरखेडे, चिंचगव्हाण, उपखेड, सूंदरनगर, पळासरे,दहिवद,मेहूणबारे, खडकीसीम,धामणगाव, तिरपोळे,पिलखोड, सायगाव रामनगर अशा अनेक गावातील कूस्तीपटू ,नागरिक, पंचक्रोशीतील आजी माजी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, सदस्य उपस्थित होते. लोंढे गावाच्या वतीने जिभाऊ चौधरी, सूरेश आप्पा, संजूआबा फौजी, रघुनाथ रावते, बापू मोरे, चिंधा मोरे, शिवाजी भगत, हरदास मोरे, नाना नाईक, नाना दणके ,माधवराव निकम, रावसाहेब निकम यांनी मंगेश चव्हाण यांचा सत्कार केला. पंचक्रोशीतील नागरिकांनी व मल्लांनी भरभरून प्रतिसाद देत घोषणा दिल्या. यावेळी प्रा.सूनील निकम यांनी सूत्रसंचालन केले. गावासाठी मंगेश चव्हाण यांनी कूस्तीस्पर्धेचे आमंत्रण स्विकारून शक्य तेवढी मदत केली. शालेय विद्यार्थ्यांना मोफत दप्तर पाठवले तसेच शीतशवपेटी सूध्दा देणार आहेत म्हणून गावाच्या वतीने प्रा.सूनील निकम यांनी त्यांचे गावातर्फे आभार मानले. महादेव मंदिर परिसरात तसेच गावात अनेक ठिकाणी विकास कामे करण्यासाठी खूप संधी असल्याचे सांगून संपूर्ण गाव व परिसर कमळाच्या सोबत राहतो आणि राहील अशी ग्वाही दिली. दरेगावचे माजी सरपंच यांचे सूपूत्र सोमनाथ माळी, सरपंच बंधू दिपक महाजन, राजू साबळे, नाना देसले, विसापूरचे धर्मा पहेलवान यांचे चिरंजीव, सरपंच समाधान राठोड, रामनगरचे बूथप्रमूख कोमलसिंग जाट, दशरथ दादा, कृष्णापुरीचे ग्रामपंचायत सदस्य रूपेश जाधव, बूथप्रमूख, कांतीलाल, यांनी मंगेश चव्हाण यांच्याशी समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, भविष्यात मी पूर्ण साथ देणार आहे. तरूणांना न फसवता,योग्य तो मार्ग दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. जास्त आश्वासन न देता कृतीतून काम करण्याची माझी सवय आहे व ती मी भविष्यात सूध्दा ठेवणार आहे. चाळीसगाव ही मल्लांची पंढरी असून या खेळाला मी नेहमी प्रोत्साहन देणार आहे. आपल्यातून अजून पै.विजय चौधरींसारखे महाराष्ट्र केसरी पुढे यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
.