सिध्दार्थ लॉन येथील योग शिबिराला उत्तम प्रतिसाद; आ. राजूमामा भोळे यांची उपस्थिती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज जागतिक योग दिनानिमित्त जळगाव शहरातील मेहरूण परिसरात असलेल्या सिध्दार्थ लॉन येथे ओम् योगा गृप, रोटरी क्लब ऑफ गोल्ड सीटी जळगाव व महाराष्ट्र योग शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष योग शिक्षक सुनील गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.

प्रमुख पाहुणे म्हणून जळगांव येथिल सुप्रसिद्ध डॉ शेखर रायसोनी, कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. राजूमामा भोळे हे उपस्थित होते. योग शिक्षक सुनील गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिर संपन्न झाले. सहशिक्षक म्हणून डॉ दिलीप पाटील व श्री विजय कुकरेजा यांनी आसने व प्राणायाम करून दाखविले.

यावेळी आमदार राजूमामा भोळे यांचा सत्कार डॉ. शेखर रायसोनी व महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष योग शिक्षक सुनील गुरव व रोटरी क्लब ऑफ गोल्ड सीटी जळगांव यांचे पदाधिकारी यांच्याहस्ते करण्यात आला. त्यानंतर रायसोनी डॉक्टरांचा सत्कार आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रेम कटारिया यांनी तर आभार प्रदर्शन योग शिक्षक सुनील गुरव यांनी केले.

डॉ शरयू विसपुते मॅडमच्या टीमने रिदमिक योगा सादर केला. फाऊंडर मेंबर योगसाधक अनिल हसवानी, मनोज कटारिया, नरेश कावणा, योग शिक्षक श्री सुनील गुरव यांचा सुध्दा सत्कार डॉ अभय गुजराथी व डॉ शेखर रायसोनी यांचे हस्ते करण्यात आला.

योगशिबिरासाठी 100 च्यावर योगसाधक, योगप्रेमी, महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे पदाधिकारी व सदस्य, रोटरी चे पदाधिकारी व सदस्य, ओम योगा गृपचे नियमित योगसाधक व हरी ओम वाकिंग गृपचे सदस्य उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम खूपच छान झाला. सर्वांना नाश्ता व चहापाणी देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. अशी माहिती योग शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील गुरव यांनी कळविले.

Protected Content