पहूर येथील तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह : बाधितांची संख्या १८

पहूर , ता. जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथे बाधित तरुणाच्या कुटुंबातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात चार वर्षीय बालिकेचा समावेश असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ .चांदा यांनी दिली .

पहूर कसबे येथील मज्जिद गल्लीत राहणाऱ्या टेलर व्यावसायिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कातील १४ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील ६५ वर्षीय वृद्धासह ३० वर्षीय तरुणाचा आणि ४ वर्षीय चिमुकलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  यापूर्वीच मज्जिद गल्लीचा भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. पहूर-कसबे ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. दरम्यान ,पहूर क्वारंटाईन सेंटरमधील ३४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

पहूर परिसरातील आजचे बाधित खालील प्रमाणे
पहूर – कसबे -३
सोनाळा -२
पाळधी – १
चिंचखेडा – १
लोंढरी – १

Protected Content