आजोबांच्या दशक्रिया विधी दरम्यान नातवाचा बुडून मृत्यू

WhatsApp Image 2019 07 23 at 1.31.08 PM

जामनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील वाकी खुर्द येथील ७ वर्षीय बालकाचा आजोबांच्या दशक्रिया विधीच्या दरम्यान नदीत बुडून म्रुत्यु झाल्याची घटना. आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला.

 

याबाबत सविस्तर असे की, मयत बालक मयंक संतोष बऱ्हाट (वय-७) हा बालक आपल्या पालक नातेवाईकांसोबत आजोबांच्या दशक्रिया विधीसाठी आज सकाळी गावातील नदीवर गेले. विधी दरम्यान मयंक पाण्यात बुडाला व त्याचा म्रुत्यु दुख:द झाल्याची घडली. आजोबांचा म्रुत्यु आणि त्यातच आता दहाव्या दिवशी नातवाचा म्रुत्यु झाल्याची घटना मनाला चटका लावणारी आहे. नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content