अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील देवगाव देवळी येथील योगेश धर्मराज पाटील या जवानाची सेवानिवृत्त झाल्यानिमित्त घोड्यावरून मिरवणूक काढून त्यांच्या देशसेवेबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
देवगाव- देवळी (ता. अमळनेर) येथील योगेश धर्मराज पाटील हा जवान नुकताच निवृत्त झाला. त्यांचे अमळनेर रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे गावकर्यांनी त्यांची घोड्यावर बसवून सवाद्य मिरवणुकही काढली. योगेश पाटील हे २००१ मध्ये भारतीय सैन्यदलात दाखल झाले होते. ते सध्या गोपालपूर (ओरिसा) येथील प्रशिक्षण केंद्रात एअर डिफेन्स विभागात इन्स्ट्रक्टर म्हणून १७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मार्चला निवृत्त झाले. निवृत्त झाल्यांनतर प्रथमच ते कुटुंबासमवेत गावी परतले. त्यांचे अमळनेरला रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर औक्षण करण्यात आले.
यावेळी त्यांचे वडील धर्मराज पाटील, लताबाई पाटील, प्रकाश पाटील, सोनिया पाटील, विजय वैराळे, अविनाश माळी, विक्रम पवार, अमोल जाधव, स्वाती माळी, सिमा जाधव, बन्सीलाल महाजन, कैलास माळी, नीलेश चौधरी, किशोर पवार, ऋषिकेश महाजन, कल्पना चौधरी, भावना पाटील, अरूण पाटील, प्रशांत पाटील, किरण चौधरी, प्रियांका माळी, तेजस्वीनी माळी, प्रशांत चौधरी आदी उपस्थित होते. गावात आल्यानंतर घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली. सवाद्य मिरवणुकीत अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते. देशभक्तीपर गीतांनी परिसर दुमदुमला होता.