पहूरला श्रीराम जन्मोत्सवास प्रारंभ

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर पेठ येथील ११९ वर्षांची परंपरा लाभलेल्या श्रीराम जन्मोत्सवास प्रारंभ झाला आहे.

अयोध्यापती प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पहूरची भूमी पूनीत झालेली असून येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त श्रीराम मंदिरात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हभप देवराम महाराज, हरेश्‍वर पिंपळगांव, हभप आकाश महाराज जळके, हभप सुधन्वा महाराज , सोयगांव , हभप बाजीराव महाराज शेरी, हभप प्रकाश महाराज पहूर -कसबे यांचे दररोज रात्री कीर्तन होणार असून श्रीरामनवमीस भागवताचार्य हभप मुकूंदा महाराज, पहूर कसबे यांचे सकाळी दहाला काल्याचे कीर्तन होणार आहे. यशस्वीतेसाठी राजू पाटील, पितांबर कलाल, कैलास पाटील, भिकन भोई, शेनफडू तरवाडे, रामदास कुंभार, नामदेव बारी यांच्यासह भजनी मंडळ व ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे.

Add Comment

Protected Content