जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एक दिवसाच्या जळगाव दौर्यावर आले असून रात्री उशीरा त्यांचे रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले.
भारतीय राष्ट्रीय सफाई मजदूर कॉंग्रेसचे महाअधिवेशन आज गोदावरी अभियांत्रीकीत आयोजीत करण्यात आले आहे. यानिमित्त कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जळगावात आले आहेत. काल रात्री उशीरा पटोले यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले. येथे जोरदार जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी रेल्वेच्या फलाटावर माजी खासदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हासदादा पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, महानगराध्यक्ष शाम तायडे, युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, माजी जि.प. गटनेते प्रभाकर सोनवणे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.