अमळनेर येथील “न्यू व्हिजन स्कूल” मध्ये भव्य विज्ञान प्रदर्शन

c1ddc55d f9c1 499b 8270 4dfdaf19118b

अमळनेर (प्रतिनिधी) न्यू व्हीजन स्कूल येथे दिनांक 28 फेब्रुवारी 2019 रोजी विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. एम. बी. मोरे तर या प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांचे परीक्षण करण्यासाठी प्रा. हर्षल बोरसे हे उपस्थित होते.

 

 

या कार्यक्रमाप्रसंगी प्रा हर्षल बोरसे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोण विकसित होण्यासाठी विज्ञानाची कास धरली पाहिजे, असे प्रतिपादन केले. तर अध्यक्षीय भाषणात प्रा. एम. बी. मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे आणि ते न्यू व्हीजन स्कूल सातत्याने करीत असते म्हणून त्यांनी कौतुकही केले. अशा उपक्रमात विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग ही खऱ्या अर्थाने यशाची गुरुकिल्ली होय, असेही त्यांनी सांगितले . याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत मेहुल चौधरी आणि दुर्गेश पाटील यांनी सहभाग घेतल्याबद्दल विध्यार्थी व क्रीडा शिक्षक यांना सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे 3 मार्च रोजी प्रसारित होणाऱ्या आकाशवाणी कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थी व शिक्षकांनाही सन्मानित करण्यात आले.

 

यावेळी संस्थेचे चेअरमन निलेश लांडगे, उपाध्यक्ष धनराज महाजन, सचिव गोकुळ पाटील, मुख्याध्यापक संदीप महाजन,उपमुख्याध्यापिका माधुरी महाजन हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अध्यक्ष शीतल देशमुख यांनी मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नीता जाधव, स्नेहा एकतारे,सुचेता शिरसाठ, दिपाली पाटील, वंदना मराठे, राजश्री चौधरी, योगिनी ओवे, रितिका मार्कंडेय, सोनाली पाटील, दिपाली राजपूत,स्वाती महाजन, विद्या महाले, सुरभी सोनवणे ,शितल निकम, हेमांगी काळकर, पूजा महाजन, वर्षा पाटील, , कविता शिसोदे, वंदना शाह, , फरीन शेख ,कल्पना कोरणी, सुरेखा सैंदाणे . क्रीडा शिक्षक सॅम शिंगाने, कलाशिक्षक, तसेच शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी अनिता पाटील, मीना पाटील, माधुरी सोनार, माधुरी बाळापुरे, वंदना सोनार, प्रतिभा पाटील, दिपाली सोनार, रमेश नाना,पंढरीनाथ बाबा यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सोनार आभार प्रदर्शन विद्या महाले यांनी केले.

Add Comment

Protected Content