Home धर्म-समाज सावदा येथे रामनवमी निमित्त भव्य पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन

सावदा येथे रामनवमी निमित्त भव्य पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले असून येथील सुंदर राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रामनवमी चे दिवशी सकाळी ६ ते ८ श्रीराम यांचा पूजा व अभिषेक, दुपारी १० ते १२ श्रीराम जन्मोत्सवाचे संजयबुवा कुळकर्णी यांचे कीर्तन दुपारी 12 वा राम जन्मोत्सव,होईल तर संध्याकाळी ६ वा येथील राम मंदिरा पासून भव्य अशा श्रीराम पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यात शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

यंदा अयोध्या येथे भव्य असे राम मंदिर बांधून झाले असून याच पार्श्वभूमीवर सावदा येथे राम नवमी निमित्त १८ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमा साठी १७ रोजी सायंकाळी पालखी नंतर स्वयंपाक तयारी साठी व १८ रोजी महाप्रसादाचे जेवणासाठी सावदा शहरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन येथील सुंदर राम मंदिराचे मोहन नम्र व  आयोजक समिती तथा समस्त सावदा शहरवासीयांचे वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound