ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त बाबुराव पाटील यांचा सत्कार

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मैत्री फाउंडेशनच्या वतीने आयोजित ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्ताने यंदाही आयोजित करण्यात आला असून यावर्षी कोरोना संकट असल्यामुळे भव्य असा कार्यक्रम न घेता ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार समारंभ करून ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

याप्रसंगी वयाच्या आठव्या वर्षापासून तर 82 वर्षापर्यंत किराणा दुकानदार बाबुराव त्र्यंबक पाटील शेठ व ज्येष्ठ नागरिक चिंतामण त्र्यंबक पाटील सत्कार करण्यात आला. बाबुराव पाटील हे जुन्या काळातील व्यापारी आजही त्यांची परिस्थिती जशी होती तशीच आहे. त्या काळातील गोरगरिबांना अन्नपुरवठा किराणा दुकान हे मंदिराच्या पारावर ठेवून गोरगरीब गरजू सतत त्यांनी मदत करणे असे त्यांचे कार्य आहे. की आज अनेक लोक यांच्यावर मोठे झाले. परंतु बाबुराव त्र्यंबक पाटील त्यास परिस्थितीमध्ये त्यांचे वय 82 असले तरी ते त्याच जोमाने आजही कार्य आहे. ज्येष्ठ नागरिकांचे वंचित साधून त्यांचा आज भव्य सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस पाटील, जितेंद्र लक्ष्मण पाटील, एन जीशेजोळ, संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष किशोर पाटील, भगवान श्रीखंडे, दीपक इंगळे संत तुकाराम महाराज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष छबिलदास पाटील आदी उपस्थित होते.

 

Protected Content