अर्थसंकल्पावरून महायुतीत धुसफूस; भाजप-राष्ट्रवादीपेक्षा शिंदे गटाला निधी कमी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर महायुतीमधील निधीवाटपाच्या समीकरणावर चर्चा रंगू लागली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना तुलनेने जास्त निधी मिळाल्याचे दिसत असताना, शिवसेना (शिंदे गट) मात्र बाजूला पडल्याची चर्चा आहे.

गेल्या वर्षी नगरविकास विभागाला ६८,६०१.२० कोटी रुपये मंजूर झाले होते, मात्र यंदा तब्बल १०,३७९.७३ कोटी रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महायुतीतील सत्ता स्थापनेपासूनच मतभेद असल्याच्या चर्चा होत होत्या. आता अर्थसंकल्पीय वाटपातही भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी वर्चस्व गाजवल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या मंत्र्यांना १ लाख कोटी, राष्ट्रवादीला तुलनेने अधिक तर शिंदे गटाला ८७ हजार कोटींचा निधी मिळाल्याने असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखाते असल्याने त्यांच्या विभागाला १,८४,२८६.६४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागाला सर्वाधिक ४४,५०६ कोटी रुपये मिळाले आहेत. नगरविकास खात्यातील मोठ्या कपातीमुळे महायुतीतील वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील राजकीय हालचालींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content