जळगाव प्रतिनिधी । येथील छत्रपती संभाजीराजे सभागृहात तिसरा ग्राहकदृष्टी पुरस्कार सोहळा शनिवारी रात्री उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र, बुलडाणा अर्बन, सोनसखी जेम्स अँड ज्वेलरी आणि ओकेजन फ्लॉवर यांचे सहकार्य लाभले.
चार्टड अकाउंटेंट असुनही सामाजिक कार्य करणार्या पंकज दारा, फोर्ड कंपनीच्या विविध मॉडल्सची सर्वाधिक विक्री व त्यानंतर उत्कृष्ट सेवा देणार्या सरस्वती फोर्डचे संचालक धवल टेकवाणी, वसंत सुपरशॉपच्या माध्यमातून व्यवसाय करताना रोटरी इंटरनेशनलच्या माध्यमातुन सामाजिक कार्य करत असलेल्या नितीन रेदासनी, युवावस्थेत वेगवेगळ्या कंपन्यांची एजन्सी समर्थपणे सांभाळत असलेल्या मयुर ट्रेडींगचे संचालक मयुर चौधरी, नाशिक येथील बांधकाम क्षेत्रात सामान्यांकरीता घराची स्वप्न पूर्ण करणार्या पार्कसाईड होम्सचे संचालक मर्जीयान पटेल यांचे प्रतिनिधि मयुरेश लोखंडे, आर एन कुलकर्णी, खान्देश खाद्य संस्कृति करीत प्रसिद्ध असलेल्या गुजरात स्वीट मार्टचे संचालक निलेश मदाणी, रुट्स, ब्रँन्ड अँन्ड इमेजच्या युवा लेखिका शिवानी गोहील, व लाईफ कोच स्नेह देसाई व शिवांगी देसाई यांना ग्राहकदृष्टी ग्राहक राजा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांनी अतिशय युवावस्थेत केलेल्या विविध सामाजिक कार्याचा आढावा घेऊन त्यांना युथ आयकॉन पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
पुरस्कार सोहळ्यानंतर यशस्वी पालकत्व या विषयावर लाईफ कोच स्नेह देसाई व शिवांगी देसाई यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यात त्यांनी नऊ मुद्यातुन संयुक्त कुटुंब पद्धति, आई, वडील, मुलं यांच्यातील संवाद, वागणुक यासह मचेंज युवर लाइफफ या विषयावर मार्गदर्शन कले. पारिवारिक जीवन, नाते-संबध, स्वास्थ्य, असीमित धन, सफ़लता, या विषयावरही त्यांनी संवाद साधला.
कार्यक्रम यशस्वीतेकरीता बँक ऑफ महाराष्ट्रचे जनसंपर्क अधिकारी श्री काकडे, बुलडाना अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे रमेश पवार, चंद्रकांत जगताप, सोनसखी जेम्स अँन्ड ज्वेलरीचे रवींद्र सोमानी, ओकेजन फ्लावरचे डॉ जगमोहन छाबड़ा, शालु छाबड़ा यांचे सहकार्य लाभले तर सौ मंजुषा, आदिती, अवनेश पात्रीकर, स्नेह अकाडमीक सर्व्हीसेस प्रा. ली.चे जनसंपर्क अधिकारी किशोर बडेशिया यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन सौ सोनल जवाहरानी व राजेश जवाहरानी यांनी केले तर आभार अदिती पात्रीकर यांनी मानले.