हिवरखेडा रस्ता काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जामनेर नगरपालिकेच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत शहरातील हिवरखेडा रोड काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

जामनेर नगरपालिकेच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 1 लाख 65 हजारांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून हिवरखेडा रोड काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून लवकरच रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती यावेळी प्राध्यापक शरद पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर शहरातील विविध विकास कामे मोठ्या प्रमाणावर आमदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून झाले असून मोठ्या प्रमाणावर नगरपालिकेचे विकास कामे चालू आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

यावेळी उपनगराध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील, मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले, नगरपालिका गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक बंटी वाघ, सुहास पाटील, उल्हास पाटील, अतिश झाल्टे, दत्तू सोनवणे, बाबुराव हिवराळे, नाजीम पार्टी, भांजा भगवान सोनवणे, रिजवान शेख, दीपक तायडे, संतोष भारी, नगरपालिका अभियंता भैय्या पाटील, दुर्गेश सोनवणे, गजानन पाटील, श्रीकांत भोसले, विकासक प्रशांत महाजन यांच्यासह नगरपालिका नगरसेवक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

 

Protected Content