ग्रेस अकॅडमीच्या विश्‍वास बारीस यांनी बुडविला लाखोंचा कर

ट्रस्टी संजय बारिस यांचा आरोप

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील हिरापूर रोड स्थित ग्रेस अकॅडमी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विश्‍वास बारीस यांनी शासनाचा लाखो रूपयांचा कर बुडविल्याचा आरोप ट्रस्टी संजय बारीश यांनी केला आहे.

याबाबत वृत्त असे की, ग्रेस अकॅडमीतील शालेय आर्थिक व्यवहारात अनेक गैरव्यवहार करून अनियमितता ठेवल्याने तसेच संस्थेचे फिच्या स्वरूपातून आणि इतर मार्गाने येणारे उत्पन्न रीतसर बँकेच्या खात्यात न जमा केल्याने हा संपूर्ण व्यवहार ऑडिटर व शासकीय कर विषयक खात्यापासून लपून राहिल्याने याद्वारे विश्‍वास बारिस यांनी शासनाचा लाखो रुपयांचा कर बुडविला असल्याचे संजय बारीस यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे. त्याच प्रमाणे अल्पसंख्यांक घटकांसाठी असलेल्या या शाळे द्वारे अल्पसंख्यांकांसाठी सामाजिक क्षेत्रात काही भरीव योगदान असायला हवे असा संकेत असतांना मात्र सामाजिक कार्यावर या संस्थेमार्फत कुठल्याही प्रकारचे योगदान दिले जात नसल्याचे बारिस यांनी पुढे म्हटले आहे.
या संस्थेत सुरू असलेल्या या संपूर्ण गैरप्रकारांची आपण वेळोवेळी शिक्षण विभाग शासन स्तरावर तक्रारी केल्या असून या संपूर्ण तक्रारींची आता उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी संजय बारिस यांनी केली आहे. दरम्यान या संस्थेचे विश्‍वास बारिस यांना या तक्रारी बाबत आपले मत काय असे विचारले असता मला यावर कुठली प्रतिक्रिया द्यावयाची नसल्याचे सांगितले आहे.

Add Comment

Protected Content