नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणूकीआधी भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. २३ मार्च रोजी सरकारने कांदा निर्याती असलेली बंदी आणखी वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही निर्यातबंदी ३१ मार्चपर्यंत लावण्यात आली होती. पण आता ही निर्यातबंदी अनिश्चित काळापर्यंत वाढवण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीपूर्वी कांदयाचे भाव वाढू नये यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे असे बोलले जात आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये कांदयाचे वाढते दरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारत सरकारने कांदयाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर देशात कांद्याच्या किमती निम्म्याने कमी झाल्या होत्या. यानंतर कांदा उत्पादकांनी आणि व्यापाऱ्यांनी सरकाराच्या निर्णयांवर निषेध ही केला होता. ही निर्यातबंदी ३१ मार्च पर्यंतच राहील अशी आशा कांदा व्यापारी करत होते. मात्र पुढील आदेशापर्यंत कांदा निर्यातीवर बंदी कायम ठेवण्यात येईल असे आदेश शुक्रवारी रात्री सरकारने जारी केले. भारत हा जगातील प्रमुख कांदयाचा निर्यातक देश आहे. भारतातून बांग्लादेश, मलेशिया, नेपाळ आणि संयुक्त अरब अमीरात या देशांमध्ये कांद्याची निर्यात केली जाते. डिसेंबर मध्ये कांद्याचे दर ४५०० रुपये प्रति क्विंटलच्या वर पोहचले होते. सध्या कांद्यांचे दर साधारणपणे १२०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत खाली आले आहेत.