उदया होणार मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जालना जिल्हयात अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे उदया २४ मार्च रोजी सकल मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे नेतृत्व मराठा आंदोलक मनोज जरांगे करणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्दयांवर सरकारने घेतलेल्या भूमिकेवर गंभीर चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी २०० फूट लांब व १०० फूट रुंद असा भव्य मंडप उभारण्यात आला आहे.

राज्यभरातील साखली व आमरण उपोषणकर्ते तथा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या मराठा तरुणांच्या कुटुंबातील सदस्य, वकील, डॉक्टर, मराठा आंदोलक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सरकारने सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मनोज जरांगे यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे या बैठकीत मनोज जरांगे पाटील कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Protected Content