मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतांनाच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज्यात आज हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आधीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गिरगाव येथील या हॉस्पिटलमध्ये काही वेळापूर्वी त्यांना आणण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानं शिवसेनेचं टेन्शन वाढलं आहे. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी तब्येत कालपासून खराब झाली होती. मागील दोन ते तीन दिवसांपासून त्यांना ताप होता. त्यामुळे त्यांनी कोरोना टेस्ट केली असता आता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
तर दुसरीकडे गोव्याचे राज्यपाल श्रीधरन यांना कोश्यारी यांचा कार्यभार मिळण्याची शक्यता आहे. यामुळे एकनाथ शिंदे हे मुंबई नव्हे तर गोव्यात पाठींब्याचे पत्र घेऊन जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.