यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या असून, यावल व चोपडा तालुका कार्यक्षेत्रासाठी गोपाळ चौधरी यांची जिल्हा उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे स्थानिक राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघासाठी विविध पदांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये यावल तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी आणि शिवसेना (उबाठा) पक्षाशी दीर्घकाळ निष्ठा राखणारे कार्यकर्ते गोपाळ चौधरी यांना चोपडा आणि यावल या दोन महत्त्वाच्या विधानसभा क्षेत्रांसाठी जिल्हा उपप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे पक्षाच्या तळागाळातील संघटनात्मक कामाला बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

गोपाळ चौधरी यांनी यापूर्वीही विविध सामाजिक आणि राजकीय उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला असून स्थानिक स्तरावर त्यांची ओळख एक कट्टर शिवसैनिक म्हणून आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे आगामी काळात पक्षाची पकड अधिक मजबूत होईल, तसेच युवक व नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, त्यांच्या निवडीचे पक्षातील वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. जिल्हा उपनेते संजय सावंत, गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा व योगीराज पाटील, तसेच यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, नगराध्यक्ष छायाताई पाटील, तालुकाप्रमुख शरद कोळी, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, नगरपालिका गटनेते सागर चौधरी, उपप्रमुख संतोष खर्चे, पप्पू जोशी, योगेश चौधरी, अजहर खाटिक, सारंग बेहडे यांसह अनेक शिवसैनिकांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.



