शेंदूर्णी येथे बंदला चांगला प्रतिसाद

शेंदूर्णी प्रतिनिधी – वेगाने वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर बुधवारी १७ मार्च २०२१ पासून दवाखाने,मेडिकल, दुध डेअरी, बँका, शासकीय कार्यालये पोस्ट सेवा इत्यादी सेवा वगळता आज कडकडीत बंद पाळण्यात आला.

त्यामुळे नेहमी गजबजलेल्या पहुर दर्जा,महावीर मार्ग,बसस्थानक व गांधी चौकातील मुख्य बाजापेठेत दवाखाने, मेडिकल व दुध डेअरी,बँक,शासकीय निमशासकीय कार्यालये या सेवा सुरु होत्या.मात्र इतर दुकाने बंद असल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता.दरम्यान येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रात कोशिल्ड, कोव्हॅकस्सीन लसीकरण मोहीम आठवड्यात सोमवार, बुधवार, शुक्रवार अशी राबविण्यात येत असल्याने येथे लसीकरण करून घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत लसीकरण करण्यापूर्वी  नागरिकांच्या अँटी जन टेस्ट घेण्यात येत आहेत त्यात ज्या नागरिकांची चाचणी सकारात्मक येत आहे त्यांना स्वतःच्या घरी अलगीकरण किंवा कोविड केअर सेंटरला पाठविले जात आहे. 

दरम्यान कोशिल्ड व कोव्हॅकस्सीन लस घेण्यामुळे कुठल्याही नागरिकाला त्रास जाणवला नाही लसीकरण पुर्णतः सुरक्षित असल्याच्या प्रतिक्रिया लसीकरण झालेल्या नागरिकांकडून येत आहे.त्यामुळे लसीबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. आता नागरिक स्वतःहून लसीकरण करून घेण्यासाठी पुढे येत आहे.नागरिकांची गर्दी बघता आठवड्यात किमान पाच दिवस लसीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहे.

 

Protected Content