नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना कोरोना विमा कवच , सानुग्रह अनुदान माहितीची मागणी

 

 

भुसावळ : प्रतिनिधी ।  कॉविड  कर्तव्य बजावताना  संक्रमणामुळे मृत्यू झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना  विमा कवच ,  सानुग्रह अनुदान देण्यात येते का? अशी विचारणा करणारी माहिती येथील  नगरपरिषदेकडे माहिती अधीकार कायद्यानुसार भाजपच्या उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ नितु पाटील यांनी मागितली आहे

 

. केंद्र शासनाचे  आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय   , राज्य शासनाचे   वित्त  मंत्रालय ,  नगरविकास विभाग ,  आणि . नगरपरिषद प्रशासन यांच्या आदेशाचा संदर्भ देत या निवेदनात डॉ नितु पाटील व त्यांचे सहकारी  यांनी कॉविड  संबंधित कर्तव्य बजावताना   संक्रमणामुळे मृत्यू झालेले अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची तसेच केंद्र व राज्य सरकारने लागू केलेल्या   विमा कवच लाभ याविषयी ११ मुद्यांवर तपशीलवार माहिती मागितली आहे,

वित्त विभागाच्या निर्णयातील   अनु.३ (ब) (५) नुसार किती महानगरपालिका , नगरपालिका ,  नगर परिषद व नगरपंचायतीनी या योजने सारखी सानुग्रह अनुदानाची योजना लागू केली आहे ? असल्यास त्याचा परिपूर्ण तपशील.द्यावा , नसेल तर अशी  योजना लागू करण्यासाठी कोणत्या अडचणी होत्या त्यांचे स्पष्टीकरण.द्यावे ,  अशा  योजना  लागू करण्याची पात्रता आहे किवा कसे ?  व  यीजना लागू करावयाच्या झाल्यास निधीची उपलब्धता  कशा  प्रकारे करण्यात येणार आहे  ? , या तपशीलाचीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे

 

भुसावळला     “अ” वर्ग नगरपरिषद असून देखील आजतागायत या शासन निर्णयाबद्दल  नगरपरिषद आणि लोकप्रतिनिधींनी  कार्यवाही केली नाही. ज्या-ज्या अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य सेवकांनी जीवाची पर्वा न करता कोरोना काळात कार्य केले, प्रसंगी संक्रमण होऊन मयत झाले तरी त्यांच्या बददल आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल भुसावळ नगरपालिकेला कुठलेही आस्था दिसून येत नाही. असे ६०० च्या जवळपास कर्मचारी आहेत., असे डॉ नितु पाटील यांचे म्हणणे आहे

 

दुसऱ्या  लाटेची शक्यता पाहता  भुसावळ नगरपरिषद  कर्मचारी,अधिकारी वर्गाची  विमा कवच योजना “   अमलात आणावी ,  शहीद  कोरोना  योद्धे .प्रकाश दुरकुले आणि विजयसिंग राजपुत यांच्या वारसांना एकरकमी सानुग्रह मदत  प्रत्येकी २१ लाख रु. देण्यात यावे. अन्यथा  भुसावळ नगरपरिषद समोर तीव्र आंदोलन  उभारले जाईल असा इशारा भाजपच्या उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ नितु पाटील ,  उत्तर भारतीय आघाडी जळगाव जिल्हा अध्यक्ष रमाशंकर दुबे, भाजप भुसावळ  शहर अध्यक्ष परीक्षित  बऱ्हाटे  , संदीप सुरवाडे, शिशिर जावळे आदींनी दिला आहे

 

Protected Content