शुभ वार्ता….देशातील कोरोना बाधीतांच्या संख्येत घट !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असतांना गत चोवीस तासांमध्ये बाधीतांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार,  गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 81 हजार 386 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 106 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 78 हजार 741 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 49 लाख 65 हजार 463 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 74 हजार 390 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. देशात 2 कोटी 11 लाख 74 हजार 76 रुग्ण बरे झाले आहेत. तर 35 लाख 16 हजार 997 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

कोरोनाने सर्वाधिक प्रभावित १० राज्यांमध्ये सक्रिय रुग्णांमध्ये गतीने घट होत आहे. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, छत्तीसगढ, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड तसेच हरियाणाचा समावेश आहे.  परंतु ८ राज्यांमध्ये सक्रिय रुग्ण गतीने वाढत आहेत. यामध्ये तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, आसाम, ओडिशा, त्रिपुरा तसेच उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे.

Protected Content