उत्तर प्रदेश (वृत्तसंस्था) पतीचा काळा रंग आवडला नाही म्हणून पत्नीने त्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यांत घडली आहे. याप्रकरणी प्रेमश्री (२२) विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे.
बरेलीतील खुर्द फतेहगढ पोलीस ठाणेच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सहदेव सिंह यांनी सांगितले की, येथील 22 वर्षीय महिलेने आपल्या पतीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले. घटनेनंतर तात्काळ पतीस रुग्णालयात नेण्यात आले होते, पण त्यांस मृत घोषित करण्यात आले. महिलेचे नाव प्रेमश्री असून तिला पोलिसांनी अटक केल्याचेही सिंह यांनी सांगितले. विशेष म्हणजे नवरा काळा असल्यानेच हे कृत्य करण्यात आल्याचे पत्नीने म्हटले आहे. सत्यवीर प्रेमश्रीहून दोन वर्षं मोठा होता आणि काळ्या रंगाचा होता. ही गोष्ट तिला अजिबात आवडत नसे. यावरून ती त्याला रोज टोमणे मारायची. पण प्रेमश्रीवर प्रचंड प्रेम करत असल्यामुळे तो कधीच काही म्हणायचा नाही. पण तिचा राग इतक्या टोकाला जाईल याची कोणीच कधी कल्पना केली नव्हती.