केवळ दोन रुपयात द्या ईव्हीएमला आव्हान

TH26VVPAT

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षापासून ईव्हीएम मशिनवर राजकीय पक्षांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. त्यामुळे मतदारांच्या मनातही ईव्हीएमबाबत शंका उपस्थित होते. हाच गोंधळ लक्षात घेता मतदारांना आपण कोणाला मत दिले याची खात्री करुन देण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे यंदा ईव्हीएमसह व्हीव्हीपॅट मशिनही मतदान केंद्रात लावली जाणार आहेत. जर संशय असेल तर व्हीव्हीपॅट मशिनला मतदार थेट आव्हान देऊ शकतो. त्यासाठी त्याला फक्त २.०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच जर व्हीव्हीपॅटला दिलेले आव्हान चुकीचे असेल तर त्यांच्याविरोधात गंभीर गुन्हा नोंद केली जाणार आहे.

 

मतदाराने २.०० रुपये फी भरुन व्हीव्हीपॅटला आव्हान दिल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून संबंधित पक्षाच्या प्रतिनिधींसमोर व्हीव्हीपॅटची ट्रायल करुन सत्य समोर आणलं जाईल. मात्र या प्रक्रियेनंतर जर तुमचा आरोप खोटा निघाला तर संबंधितांवर प्रशासनाकडून एफआयआर दाखल केली जाणार आहे. निवडणूक आयोगाकडून यंदा एम-३ मशिन बनवण्यात आले आहेत. त्याद्वारे तुम्ही ईव्हीएममध्ये कोणाला मतदान केलं याची शंका असेल तर त्याला तुम्ही आव्हान देऊ शकता अशी व्यवस्था निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.

या कलमांखाली नोंदवणार गुन्हा- व्हीव्हीपॅटला आव्हान दिल्यानंतर जर तुमचा आरोप खोटा निघाला तर प्रशासनाकडून तुमच्यावर एफआयआर दाखल होऊ शकते. आयपीसी १७७ कलमांतर्गत तुमच्यावर गुन्हा नोंद होऊ शकतो. या कलमानुसार तुम्हाला सहा महिने कारावास सोबत हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. तसेच लोक प्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम २६ अंतर्गतही गुन्हा नोंद होऊ शकतो.

Add Comment

Protected Content