खुशखबर ! गॅस सिलिंडरच्या दरात ७० ते ७२ रुपयांनी घट

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या सोने चांदीचे दर गगनाला भिडत असताना अशातच ग्राहकांना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. जून महिन्याला सुरुवात झाली असून आजपासून वाहतुकीच्या अनेक नियमांत बदल झाले आहेत. त्यासोबत गॅस सिलेंडरच्या दरातही घट केली असल्याची आनंदाची माहिती मिळाली आहे.

देशातील ऑईल कंपन्यांनी सलग तिसऱ्यांदा व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी केले आहेत. गेल्या तीन महिन्यांत चार महानगरातील व्यावसायिक गॅस सिलिंडर ११९ ते १२४ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. तर जून महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ७० ते ७२ रुपयांनी घट झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात घट होत आहे. मात्र या काळात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही घट झालेली नाही. त्यामुळे घरघुती ग्राहकांच्या हाती निराशा आली आहे.

आयओसीएलच्या माहितीनुसार, देशातील चार महानगरांत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात घट करण्यात आली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर ६९.५ रुपयांनी स्वस्त झाले आहे त्यामुळे आता दिल्ली आणि मुंबईत गॅस सिलिंडरचा दर क्रमश: १६७६ रुपये आणि १६२९ रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्याचबरोबर कोलकत्ता शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडर ७२ रुपयांनी स्वस्त झाला असून येथे सिलेंडरचा दर १७८७ रुपये झाला आहे. तर चेन्नईत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ७०.५ रुपयांनी घट होऊन सिलिंडरचे दर १८४०.५० रुपयांनी उतरले आहेत.

Protected Content