सोने चांदीच्या भावात तेजी तरी खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह (व्हिडीओ)

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या सण म्हणजेच गुढीपाडवा त्यामुळे हा मुहूर्त साधत मोठ्या प्रमाणात सोने चांदीची खरेदी केली जाते. भावामध्ये तेजी असली तरी खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह दिसून येत असून जळगावच्या सराफ बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली.

परंपरागत मुहूर्ताच्या दिवशी सोने व चांदीच्या खरेदीला विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते. शुभ मुहूर्ताला केलेली सोने खरेदीने समृद्धीत वाढ होत असल्याची अनेकांची श्रद्धा असल्याने अनेक जण या मुहूर्तावर सोने खरेदी करीत असतात. याच अनुषंगानं शहरात ज्वेलरीत रोझवर्ल्ड ज्वेलरी, पेशवाई ज्वेलरी याप्रमाणे कमी वजनांमध्ये चांगले दागिने, देवीदेवतांचे टाक, ज्वेलरी, अंगठ्या, बांगड्या, मंगळसूत्र, मंगलपोत यासह लग्न बस्त्याची सोनेखरेदी या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी केली.

आज शनिवार, २ एप्रिल रोजी राज्याची सुवर्णनगरी असलेल्या जळगावमध्ये 24 कॅरट सोन्याचे भाव 51 हजार 225 प्रति ग्रॅम आहे. तर चांदी भाव 68 हजार 807 रुपये प्रति किलो असतांनाही पाडव्याच्या मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी जळगावच्या सराफा बाजारात ग्राहकांची एकच गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. कोरोनामुळे ग्राहकांचा गुढीपाडव्याचा मुहूर्त टळला होता मात्र यावर्षी कोरोना निर्बंध शिथिल आल्याने जळगावातील सराफ बाजारात उत्साहाचे वातावरण असून मोठी उलाढाल पहायला मिळाली.

व्हिडीओ लिंक

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3369094099978568

Protected Content