हातभट्टीची गावठी दारुची वाहतुक करणार्‍या दोघांवर कारवाई

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  दूध फेडरेशनजवळून हातभट्टीची गावठी दारुची वाहतुक करणार्‍या दोघांवर मंगळवारी शहर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून २२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहरातील दूध फेडरेशनजवळून हातभट्टीची गावठी दारुची वाहतुक होत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांना मिळाली. त्यांनी तात्काळ विजय निकुंभ, प्रफुल्ल पाटील, प्रणेश ठाकूर, राजकुमार चव्हाण यांचे पथक तयार केले. या पथकाने दूध फेडरेशन परिसरात सापळा रचला असता, त्यांना याठिकाणाहून एमएच १९ व्ही १९४३ क्रमांकाच्या दुचाकीवरुन दोन इसम काळ्या रंगाच्या कॅनांमध्ये हातभट्टी गावठी दारुची वाहतुक करीत होते. दरम्यान पोलिसांनी हिरालाल महारु कोळी (वय-२२) व सचिन महारु कोळी (वय-२२) दोघ रा. भोलाने ता. जळगाव दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून २ हजार रुपयांची गावठी दारु व २० हजारांची मोटारसायकल असा एकूण २२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तसेच दोघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content