मुंबई प्रतिनिधी । आर्थिक मंदीमुळे गुंतवणूकदारांची पावले सोन्याकडे वळू लागल्याने सोन्याच्या भावात तेजीने वाढ होत आहे. पुढील काही महिन्यात म्हणजेच दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर ५० हजार प्रति तोळे जाण्याची शक्यता आहे. तर सध्याला सोने प्रति तोळं 39 ते 40 हजारांच्या आसपास चालू आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ हजार ५५० डॉलरवर असलेले प्रति औंस सोन्याचे दर २ हजार डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने वर्तवली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रति औंस १ हजार ५५० डॉलर प्रमाणे १ लाख ८ हजार ५०० रुपये प्रति ग्रॅम म्हणजे सुमारे ३ हजार ८२७ रुपये, इतके सोन्याचे सध्याचे दर आहेत. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम आणि १ डॉलर म्हणजे ७० रुपये) हे दर प्रति औंस दोन हजार झाल्यास सोन्याची किंमत प्रति तोळे ५० हजारांच्या आसपास पोहोचणार आहे.