जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बजरंग बोगदा येथे पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सोन्याची चैन जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली आहे. या संदर्भात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, अनिता राजेंद्र जैन (वय 55 रा.प्रेम नगर जळगाव) या महिला शुक्रवारी 11 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता शहरातील बजरंग बोगदा येथून पायी जाता होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सोन्याची मंगळसूत्र धूम स्टाइल चोरून नेल्याची घटना घडली. ही घटना घडल्यानंतर महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर सायंकाळी 5 वाजता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहे.