पहूर, ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर पेठ येथील कृष्ण मंदिरात कृष्ण जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला व काल्याच्या कीर्तनाने जन्मोत्सवाची सांगता करण्यात आली. पहूर पेठ व पहूर कसबे तसेच पहूर बस स्थानक परिसरात दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या दोन्ही गावात चौका चौकात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. गोविंदा आला रे आला च्या गजरात तरुणांनी उत्साहात दहीहंडी फोडले.
पहूर येथील मानाची दहीहंडी म्हणून परिचित असलेल्या पहूर बस स्थानक परिसरात लावलेली मानाची दहीहंडी रात्री दहा वाजेच्या सुमारास फोडण्यात आली. यावेळी आजारोंच्या वर जनसमुदाय हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी बस स्थानक परिसरात जमला होता. यावेळी पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, पीएसआय भरत दाते ,पीएसआय गणेश सुस्ते, रवींद्र देशमुख यांचे सह पहूर पोलीस स्टॉप यांनी चोक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मोठ्या उत्साहात दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झाला.