जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोजराई फाउंडेशनच्या वतीने महात्मा जोतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, सामाजिक जाणीव आणि अभिव्यक्तीचा विकास व्हावा या उद्देशाने राबविण्यात येत आहे.
स्पर्धांचे प्रकार: काव्य व लेखन स्पर्धा – सामाजिक विषयांवर आधारित सर्जनशील लेखन
चित्रकला स्पर्धा – महापुरुषांचे विचार, संघर्ष आणि प्रेरणा यावर आधारित कलाकृती
रील मेकिंग स्पर्धा – सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावी संदेश देणाऱ्या लघु व्हिडीओज
अंतिम दिनांक: १८ एप्रिल २०२५
सहभागी होण्यासाठी Google Form भरावा:
https://docs.google.com/forms/d/1W3XYCOn_hzS4OVar6QoMa2sW_SYhCUSP2FaciRoY-eo/edit
अधिक माहितीसाठी संपर्क:
7709605921 / 8956078874