चाळीसगाव, प्रतिनिधी | माझी जन्म व कर्मभुमी चाळीसगाव हीच असुन आजवर चाळीसगावकरांनी मला भरभरुन प्रेम व आशिर्वाद दिला आहे. या ऋणातुन उतराई होण्यासाठी जनसेवक म्हणून मला येत्या विधानसभेत निवडून देऊन सेवेची संधी द्यावी असे आवाहन डॉ. विनोद कोतकर यांनी केले. ते आडगाव येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना बोलत होते.
माझ्याकडे आजवर जे आहे ते मला चाळीसगावकरांनी दिलेले आहे. त्या चाळीसगाव वासियांचे आपण काहीतरी देणेकरी लागतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत समाजकारण करत असताना येत्या विधानसभेत उमेदवारी करण्याचा विचार माझ्या मनात आला. कुठलेही मतभेद न ठेवता राजकारणाच्या पलिकडे जाऊन जनतेचा उमेदवार म्हणुन अपक्ष उमेदवारी घेत मी नागरीकांसमोर मी बघितलेल्या शाश्वत विकासाचे धोरण मांडले आहे.गावोगावी जाऊन गावातील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष भेटी घेत कुठल्याही प्रचारसभा न घेता लोकांच्या समस्या जाणुन घेत आहे. चाळीसगाव तालुक्यातील सुजान, सुज्ञ व लोकशाहीवर प्रेम करणार्या नागरीकांवर माझा विश्वास आहे. येत्या विधानसभेत एक सुसंस्कृत उमेदवार म्हणून मला निवडून द्या. मी दिलेल्या संधीच सोने करीन असा विश्वास त्यांनी मतदारांशी संवाद साधताना दिला. तालुक्यातील रखडलेले प्रश्न बेरोजगारी व खुंटलेला विकास लक्षात घेता यावर सर्वार्थाने विचाराधीन राहून भविष्यात चाळीसगाव तालुका समृद्ध केल्याशिवाय गप्प बसणार नाही. गतकाळातील माझ्या समाजसेवाचा आरसा सर्वजण जाणुन आहेत. याआधारे ही उमेदवारी देखील मी भविष्यात सार्थ ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले.