विधीमंडळाच्या ग्रंथालय समितीवर आ. चव्हाण यांची निवड

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांची महाराष्ट्र विधिमंडळ ग्रंथालय समितीच्या सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली. त्याबद्दल नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे पदाधिकारी यांनी आज दि.१० डिसेंबर रोजी त्यांचा कार्यालयात सत्कार केला व त्यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले.

नाशिक ग्रंथालय विभाग संघाचे प्रमुख कार्यवाह तथा शेठ नारायण बंकट वाचनालयाचे ग्रंथपाल ग्रंथमित्र अण्णा धुमाळ, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तथा खेडगाव येथील लोककवी वाचनालायाचे संस्थापक के. बी. दादा साळुंखे, आशिर्वाद सार्वजनिक वाचनालय केकी मूस ट्रस्ट चे ग्रंथपाल सौ.वीणा श्रीकांत डफळापुरकर, ज्ञानसागर वाचनालयाचे संजय यशोद, ज्ञान भूषण वाचनालयचे विकास खैरे, बालकवी ठोंबरे वाचनालयाचे प्रा.चंद्रकांत ठोंबरे, शेठ नारायण बंकट वाचनालयाचे सहाय्यक ग्रंथपाल सौ.ज्योती अशोक पोतदार, प्रशांत वैद्य, अंबादास घुले, श्याम रोकडे आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सार्वजनिक ग्रंथालय व तेथे कार्यरत कर्मचारी यांच्या समस्यांबाबत सविस्तर माहिती घेत त्यावरील उपाययोजना बाबत चर्चा केली.

महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना सन २०२०-२१ या वर्षात केवळ १० टक्के अनुदान राशी प्राप्त झाली आहे तसेच मागील ९ महिन्यांपासून ग्रंथालय कर्मचारी यांना पगार नसल्याने त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रंथालये यांना आर्थिक समृद्धी नसल्याने इतर खर्चांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याच्या समस्या ग्रंथालय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडल्या. त्यावर आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, विधिमंडळाचा व ग्रंथालय समितीचा सदस्य म्हणून दोन्ही ठिकाणी मी आपला प्रतिनिधी म्हणून मी आपल्या समस्या मांडेल, त्यासाठी येत्या अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न मांडून सोबतच ग्रंथालय समितीचे अध्यक्ष यांना पत्र देऊन त्यांचे लक्ष या समस्यांकडे वेधणार असल्याचे आश्वासन आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले.

Protected Content