गोगादेव महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक

जळगाव प्रतिनिधी । येथील मेहतर समाजातर्फे गोगादेव महाराज, नवलस्वामी महाराज व वीरपुरुष रतनसिंग महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

संत नवलस्वामी महाराज, गोगादेव महाराज व रामदेवबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करून गुरुनानकनगरातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंडोरे यांच्याहस्ते महाआरती, विविध धार्मिक कार्यक्रम व पूजाविधी करण्यात आला. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, आयुक्त डॉ. उदय टेकाळे, डॉ. निलाभ रोहन, मुकुंद सपकाळे, हरी सपकाळे, आत्मचरण ढंढोरे, दिलीप सपकाळे, अशोक हंसकर, छन्नू ढंढोरे, पूनमचंद गोयर, ग्यानचंद पवार, भगवान ढंढोरे, कांती चांगरे आदी उपस्थित होते. नवलधाम गोगामढी रामदेवजीबाबा मंदिरापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत आकर्षक चित्ररथ हे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले.

Protected Content