जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाऊंडेशन संचालित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ऍण्ड रिसर्च एमबीए महाविद्यालयातर्फे एमआयडीसी परिसरात कोविड-१९ लसीकरण जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा मुख्य उद्देश हा लसीकरणाबद्दल जनजागृती करणे हा होता.
कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी महाविदयलायचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी लसीकरणाबद्दल माहिती दिली व सांगितले की आपला देश आत्ताच तिसऱ्या लाटेपासून सावरला आहे पण तरीही कोरोनाचा धोका अजूनही गेलेला नाही. एक ठिणगी जशी आग लावू शकते तसेच कोरोनाचा उद्रेक पुन्हा न होण्यासाठी आपण एक जबाबदार नागरिक बनून सरकारने निर्देशित केलेल्या नियमांचे पालन करणे, जसे लस घेणे, मास्क घालणे, सोशल डिस्टनसिंग, सॅनिटीझरचा वापर करणे इ. अत्यंत गरजेचे आहे.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एम. आय.डी. सी. परिसरात वेगवेगळ्या कंपनीमध्ये जाऊन कोरोनाच्या लसीबद्दलच्या माहितीचे पत्रक वाटण्यात आले व लसीकरणाबद्दल माहिती देण्यात आली. सदर मोहीमेच्या वेळेस कोरोनाच्या नियमांचे पालन केले गेले.
यावेळी महाविद्यालयाचे डॉ. नीलिमा वारके, प्रा. मकरंद गोडबोले, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. चेतन सरोदे, डॉ. अनुभूती शिंदे, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. आफ्रिन खान, प्रा. अश्विनी सोनवणे, प्रा. श्रुतिका नेवे, प्रा.चारुशीला चौधरी, प्रा. मिताली शिंदे, प्रा. प्रिया फालक, प्रा. चंद्रकांत डोंगरे, प्रा. दिपक दांडगे, मयुर पाटील, गौरव पाटील, सागर चौधरी, गणेश सरोदे, प्रशांत किरंगे, जीवन पाटील, प्रफुल्ल भोळे, रुपेश पाटील, घनश्याम पाटील, रुपेश तायडे, जयश्री चौधरी, भावना ठाकूर इ. कर्मचारी उपस्थित होते.