भडगाव ग्रामीण रुग्णालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात

भडगाव प्रतिनिधी । भडगाव ग्रामीण रुग्णालयात नुकताच प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून पत्रकार नरसिंग भुरे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी आरोग्यदुत न्युज चॅनलचे मुख्य संपादक नरसिंग भुरे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज जाधव यांचे सह कर्मचारी उपस्थित होते. कोरोना च्या पार्श्र्वभूमीवर सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला.

 

Protected Content