गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे प्रा. पियुष वाघ आणि प्रा. रेबेका लोंढे यांचे यश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे प्रा.पियुष वाघ,प्रा. रेबेका लोंढे यांनी भारतीय ज्ञान परंपरा प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग नोंदवत यश प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे संपुर्ण भारतातून परिचारिका अभ्यासक्रमातून पहिल्यांदाच या कार्यक्रमात सहभागी होण्याचा मान देखिल मिळवला आहे.

 

वेदांमध्ये अत्याधुनिक गोष्टी, विविध संशोधनाचा प्राचीन काळात उल्‍लेख केलेला आहे.  उदा. वैमानिक शास्त्र, गणित शास्त्र, भौतिक शास्त्र, ज्योतिष शास्त्र, आयुर्वेद ,मंदिर निर्माण, वास्तुचिकीत्सा, जैन व बौध्दकालीन कलाकृती, लेणी, तत्वज्ञान, योग, प्राचिन क्रिडा, इ गोष्टी त्याचे पुरावे हे वेदाच्या आधारे या कार्यक्रमात देण्यात आले. भारतिय ज्ञान परंपरेअंतर्गत उपस्थीत सर्व प्राध्यापकांना संपुर्ण ज्ञान प्रदान करण्यात आले. यासाठी भारतातील भारतिय परंपरेकरीता संचलित असलेल्या विविध विदयापिठातील मुख्य अधिष्टाते, आचार्य, पौराणिक कला शास्त्र यांना तासिका सत्र घेण्याकरीता आमंत्रित केले होते. अंतिम सत्रात प्रशिक्षणार्थी प्राध्यापकांच्या प्रश्‍नांचे शंका निरसन करण्यात आले. मानव संसाधन विकास केंद्र अंतर्गत, राष्ट्रीय संत तुुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, शिक्षण मंत्रालयाच्या भारतीय ज्ञान प्रणाली विभागाच्या सहकार्याने, महाराष्ट्रात नागपूर शहरात चिटणिस पार्क सिव्हील लाईन येथे प्रथमच ३१ जूलै ते ५ ऑगस्ट ६ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होेता. भारतात महाराष्ट्र,चेन्नई, वाराणसी,श्रीनगर,गोवाटी आणि नवी दिल्‍ली अशा ६ ठीकाणी हा कार्यक्रम होणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमात एचआरडीसीने महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, दीव दमण राज्यांतील विविध विषयांतील १८० सहभागींची निवड केली.

 

भारतीय ज्ञान परंपरेचा अभ्यास विविध शाखांमध्ये समाविष्ट करण्याचा उददेश या प्रशिक्षण कार्यक्रमाचा होता. यासाठी प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले. शिक्षण कार्यक्रमात सहभागी होणा—या गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे प्रा. पियुष वाघ आणि प्रा. रेबेका लोंढे यांनी हे प्रशिक्षण ग्रेड ए मध्ये उर्त्‍तीण होत यश प्राप्त केले आहे. समारोपप्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्ष म्हणून आचार्य जितेंद्रनाथ महाराज मठाधिश अमरावती समवेत कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, युजीसी सचिव प्रा. मनिष जोशी,अ.भा.राष्ट्रीय शैक्षणिक संघ डॉ.कल्पना पांडे,डॉ. निरंजन देशकर, परिक्षा व मुल्यमापन मंडळ संचालक डॉ. प्रफुल्‍ल साबळे, वित्‍त व लेखा अधिकारी डॉ. हरीष पालीवाल, डॉ. अनुराग देशपांडे, डॉ. चंद्रशेखर देठे संचालक युजीसी, डॉ. प्रिती धार्मिक यांच्या उपस्थीतीत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. डॉ. प्रिती धार्मीक यांनी सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

Protected Content