जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालय व डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेज ऑफ कॉम्पुटर अँप्लिकेशन महाविद्यालयात आज शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला.
कार्यक्रमाची सुरुवात व्यवस्थापन महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून केली. यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांचे स्वागत विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. कार्यक्रमात बी.बी.ए, बी.सी.ए च्या विद्यार्थ्यांनी ग्रुप डान्स, गाणी, कविता, मनोगत इत्यादी सादर केले. शिक्षकांसाठी संगीत खुर्ची व वेगवेगळे खेळ घेतले गेले. कार्यक्रमाचे आयोजन व त्यासाठी लागणारी तयारी ही विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन केलेली होती. यावेळी शिक्षकांच्या हस्ते केक कापण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्नती तांबे व आभारप्रदर्शन आदित्य पाटील याने केले. कार्यक्रमाचे कामकाज प्रा. वैजयंती असोदेकर यांनी बघितले.
या कार्यक्रमास डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेज ऑफ कॉम्पुटर अँप्लिकेशन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.नीलिमा वारके यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.