जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.

जिल्हा पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी डॉ. बी.जी.शेखर पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असताना पोलिस कवायत मैदानावर परेडचे आयोजन करण्यात आले होते. परेडनंतर उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
एलसीबीचे वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश राजपूत, पोउनि गणेश वाघमारे, गणेश चौबे, अमोल देवढे, सहाय्यक फौजदार अनिल जाधव, पोहेकॉ संदीप साबळे, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, सुनील दामोदरे, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, विजय पाटील, जितेंद्र पाटील, पोलिस नाईक प्रीतमकुमार पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, यांचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांदेखील गौरव करण्यात आला.
प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
पोलिस कवायत मैदानावर परेडसह पोलिसांनी प्रात्यक्षिकही सादर केले. यामध्ये पोलिसच मोर्चेकरी बनले व ते घोषणा देत आले. त्यांना पोलिसांनी रोखण्यासह दंगल झाल्यास तिला नियंत्रणाचेही प्रात्यक्षिक विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.