तरूणावर धारदार वस्तूने वार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील गर्दी जमल्याची विचारणा केल्याच्या रागातून एका तरूणाला गर्दीतील आठ ते दहा जणांनी धारदार वस्तूने वार करून जखमी केल्याची घटना शनिवारी ३ जून रोजी रात्री ९ वाजता सुप्रिम कॉलनी परिसरातील ममता बेकरीजवळ घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, राहूल संजय काकडे (वय-२२) रा. नवनाथ मंदीराजवळ, सुप्रिम कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी ३ जून रोजी रात्री ९ वाजता सुप्रिम कॉलनीतील ममता बेकरीजवळून राहूल काकडे दुचाकीने जात असतांना त्याला गर्दी दिली. गर्दी काम जमली असे विचारल्याच्या रागातून गर्दीतील आठ ते दहा जणांनी राहूल याला धारदार वस्तूने वार करून गंभीर जखमी केले. तसेच त्यांची दुचाकी (एमएच १९ सीएम ८७९८) चे ही नुकसान केले. जखमीवस्थेत तरूणाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. राहूल काकडे याने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.

Protected Content